Nitin Gadkari Threat : नितीन गडकरी धमकी प्रकरणाचा तपास NIA कडे जाण्यास अडचण? ABP Majha
Continues below advertisement
नितीन गडकरी यांना बेळगावातील तुरुंगातून दोन वेळा खंडणीसाठी धमकी देण्यात आली होती. जयेश पुजारी उर्फ शाकीरने ही धमकी दिली होती. तर हे प्रकरण तपासासाठी एनआयएच्या हाती जाण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यात. धमकी संदर्भात नागपूर पोलिसांनी UAPA कायद्यांतर्गत दोन गुन्हे नागपुरात दाखल केले होते. तर NIA ने बंगळुरात एक गुन्हा दाखल केला होता. हे सर्व गुन्हे एकत्र करण्याची मागणी NIAने नागपूर सत्र न्यायालयात केली होती. मात्र न्यायालयाने तांत्रिक व कायदेशीर बाबींचा विचार करून एनआयए ची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता नागपूर पोलीसच या प्रकरणी न्यायालयात चार्जशीट दाखल करणार असल्याची माहिती आहे.
Continues below advertisement