Nitin Gadkari Speech Shirdi : शिवशाही स्थापन करण्यासाठीच जनतेनं अभूतपूर्व यश दिलं : नितीन गडकरी

Continues below advertisement

Nitin Gadkari Speech Shirdi : शिवशाही स्थापन करण्यासाठीच जनतेनं अभूतपूर्व यश दिलं : नितीन गडकरी 

Nitin Gadkari : जनतेनं आपल्याला अभुतपुर्व यश दिलं आहे, ते शिवशाही स्थापन करण्यासाठी दिलं असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. युद्ध संपलेलं आहे, विजय झालेला आहे, मात्र, या विजयाने स्वराज्याचं सुराज्य करण्याची जबाबदारी आपली असल्याचे गडकरी म्हणाले. निवडणुकीच्या जय पराजयात सर्वच असतं असं नाही. विदर्भातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निवडणूक लढले होते, त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. पण ज्यांनी त्यांचा पराभव केला ते कोणाच्या लक्षात नाहीत, मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पुर्ण विश्वाच्या लक्षात आहेत असे गडकरी म्हणाले. त्यामुळं विजयानेच लोक तुम्हाला ओळखतील असं नाही असंही गडकरी म्हणाले. 

स्मार्ट शहरच नाहीतर स्मार्ट व्हिलेज देखील तयार झालं पाहिजे असे गडकरी म्हणाले. गावे ओस पडू लागली आहेत. लोक शहराकडे येत आहेत. गावातील स्थिती बिघडत चालली असल्याचे गडकरी म्हणाले. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे. हीच शिवशाही महाराष्ट्रात निर्माण झाली पाहिजे. ही जबाबादारी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाची आहे, आमदारांची आहे, सर्व जनतेची असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram