Jobs Crisis: 'माझ्याकडे १५ लाख कोटी आहेत, पण काम करणारे नाहीत', Nitin Gadkari यांची खंत

Continues below advertisement
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी देशातील निधी आणि मनुष्यबळ यावर एक मोठे वक्तव्य केले आहे. 'आपल्याकडे पंधरा लाख कोटी रुपये आहेत मात्र खर्च करू शकत नाही, आपल्याकडे काम करणाऱ्यांची कमतरता आहे', असे परखड मत त्यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात मांडले. पैसे आणि बाजारपेठेत गुंतवणूकदार तयार असूनही केवळ काम करणाऱ्यांच्या कमतरतेमुळे विकासकामे रखडत असल्याची खंत गडकरींनी व्यक्त केली. नवे प्रकल्प सुरू झाल्यास देशात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि या संधी इतक्या असतील की त्या पूर्ण करणेही कठीण होईल, असे सांगत त्यांनी देशातील प्रचंड क्षमतेवर (Huge Potential) भर दिला. विदर्भात पुढील पाच वर्षांत पाच लाख नोकऱ्या निर्माण करण्याचे लक्ष्य त्यांनी ठेवले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola