Majha Maharashtra Majha Vision 2021 : 'ते' काम मी नसेल केलं तर मला शिक्षा द्या : Nitin Gadkari
#NitinGadkari #MajhaMaharashtraMajhaVision #माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन
Majha Maharashtra Majha Vision 2021 : देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते अनेक देशभक्तांच्या बलिदानातून मिळालं. हा इतिहास रक्त्याच्या थारोळातून, घामाच्या, बलिदानाच्या आणि परिश्रमाच्या थेंबातून लिहिला गेला आहे. त्यामुळे त्याची जाणीव ठेवत त्यांना अभिवादन करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे, असं आपलं व्हिजन मांडताना नितीन गडकरी म्हणाले. तसेच राज्यातील कळीचा मुद्दा आहे पाणी. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भाग, कोकणातील, विदर्भ, मराठवाड्यातील दुष्काळी भाग याठिकाणी आपल्याला सिंचनाच्या सुविधा वाढवाव्या लागतील, असं केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात ते बोलत होते.
"देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते अनेक देशभक्तांच्या बलिदानातून मिळालं. हा इतिहास रक्त्याच्या थारोळातून, घामाच्या, बलिदानाच्या आणि परिश्रमाच्या थेंबातून लिहिला गेला आहे. त्यामुळे त्याची जाणीव ठेवत त्यांना अभिवादन करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. आपण पंच्याहत्तरीत पदार्पण करत आहोत. आपल्याला आत्मनिर्बर भारत बनवायचाय, असं आपलं सर्वांचं स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्याकरता सुखी, संपन्न, समृद्ध महाराष्ट्र व्हावा, हिदेखील आपल्या सर्वांच्या मनातील भावना आहे. देशाचा विकास करायचा असेल, तर गरीबी दूर झाली पाहिजे, गरिबी दूर करण्यासाठी रोजगार निर्माण करणं आवश्यक आहे. तसेच रोजगात निर्माण करण्यासाठी शेती आणि उद्योग क्षेत्राची प्रगती आणि विकास केला पाहिजे.", असं नितीन गडकरी म्हणाले. "महाराष्ट्र हे निर्यातीमध्ये आघाडीवर असणारं राज्य आहे. त्यामुळे निर्यात वाढून जास्तीत जास्त इनकम महाराष्ट्राला मिळावं यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे राज्यात आर्थिक समृद्धी येईल.", असंही ते म्हणाले.
"राज्यातील कळीचा मुद्दा आहे पाणी. मी जलसंपदा मंत्री होतो, त्यावेळी मी 40 हजार कोटी महाराष्ट्राला दिले. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भाग, कोकणातील, विदर्भ, मराठवाड्यातील दुष्काळी भाग याठिकाणी आपल्याला सिंचनाच्या सुविधा वाढवाव्या लागतील. आज राज्यात सिंचनाचं प्रमाण 22 टक्क्यांवर आहे. पण आपल्याला जलसंवर्धनाच्या मार्गातून आणि त्याचबरोबर सिंचन प्रकल्प वाढवून राज्यातील सिंचनाचं प्रमाण 50 टक्क्यांच्या वर नेणं गरजेचं आहे. हे केल्याशिवाय ग्रामीण महाराष्ट्र सुखी-समृद्ध होणार नाही.", असंही ते म्हणाले.
"समृद्धी महामार्गाच्या बाजूनं मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर 25 ते 30 लाखांची नवी पाच शहरं विकसित करण्याची आवश्यकता आहे. या शहरांना रेल्वे स्थानक, विमानतळं निर्माण करण्याची गरज आहे. त्याकरता अनेक चांगल्या जागा आणि लोकेशन्स आहेत. कारण आपल्याला आवडो किंवा न आवडो हळूहळू शहरीकरण होत आहे. त्यामुळे जागा उपलब्ध नाही, यामुळे अनेक नव्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे मुंबई, पुण्याच्या विकासाऐवजी इतर जे टू-टायर सिटी आहेत, त्याचा विकास करणं गरजेचं आहे.", असं नितीन गडकरी म्हणाले.