Nitin Desai Death: नितीन देसाईंच्या आत्महत्त्येबाबत नवी माहिती उघडकीस
Nitin Desai Death: नितीन देसाईंच्या आत्महत्त्येबाबत नवी माहिती उघडकीस विख्यात कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आयुष्याची अखेर केलीय. कर्जतच्या एनडी स्टुडिओतील त्यांच्या खोलीत त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलीय. त्यांच्या मृत्युमुळे संपूर्ण हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी शोकाकूल झालीय. वयाच्या ५८व्या वर्षी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. गेल्या काही महिन्यांपासून ते आर्थिक समस्यांमुळे तणावाखाली होते असं कळतंय. १९४२-अ लव्ह स्टोअरी हा त्यांचा पहिला गाजलेला चित्रपट. त्यानंतर माचिस, हम दिल दे चुके सनम, लगान, स्वदेस, जोधा अकबर आणि पानिपत हे त्यांत्या कला दिग्दर्शनामुळे सर्वाधिक गाजलेले चित्रपट ठरले. त्याचबरोबर लोकमान्य हा चित्रपट, आणि राजा शिवछत्रपती या मालिकेची त्यांनी निर्मिती केली होती. २००५ साली त्यांनी ए.डी.स्टुडिओ उभारला. कला दिग्दर्शनात त्यांचा हातखंडा होता आणि त्यांची किर्ती जगभरात पोहोचली होती.