Chipi Airport : उद्धव ठाकरे यांची उपस्थिती असणं हा बाळासाहेबांचा आशीर्वाद : Nitesh Rane
चिपी विमानतळाच्या (Chipi Airport) उद्घाटनाच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची उपस्थिती असणं हा आमच्यासाठी बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे, अशी प्रतिक्रिया नारायण राणेंचे पुत्र आणि आमदार नितेश राणेंनी दिली आहे. मुख्यमंत्रिपदाला गालबोट लागू नये असा आमचा प्रयत्न असणार आहे असंही नितेश राणे म्हणाले. दरम्यान आज व्यासपीठावरुन नारायण राणे त्यांचं मन मोकळं करणार आहेत. कुणाला ते आवडेल तर कुणाला ते खुपेल हे सांगायला नितेश राणे विसरले नाहीत.