मुख्यमंत्र्यांना सचिन वाझेंची वकिली का करावी लागत आहे? Nitesh Rane यांचे वरुण सरदेसाईंवर गंभीर आरोप

Continues below advertisement

मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांनी युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझे आणि वरुण सरदेसाई यांच्यात झालेल्या संभाषणाची चौकशी करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली. वरुण सरदेसाईंसोबतच्या संबंधांमुळे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सचिन वाझे यांची वकिली करत नव्हते ना? असा सवाल विचारत नितेश राणेंनी थेट निशाणा साधला आहे. याशिवाय, मुंबईतील एका शिवसेना नेत्याचं टेलिग्राम चॅट आहेत. तेही तपासून घेण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

सचिन वाझे प्रकरणाचा आयपीएलच्या सट्टेबाजांशी संबंध असल्याचा गौप्यस्फोट नितेश राणे यांनी यावेळी केला. गेल्यावर्षी आयपीएलची मालिका सप्टेंबर ते नोव्हेंबर आयपीएल मालिका खेळली गेली. आयपीएलचे जे सामने खेळवले जातात यावर सट्टा लावण्यात येत असून वाझेंकडून या सट्टेबाजांना फोन जात होता. या सट्टेबाजांना तुमचं लोकेशन आणि तुमची सर्व माहिती मला माहीत आहे. तुमच्यावर छापा पडू द्यायचा नसेल तर मला दीडशे कोटी रुपये द्या, अशी धमकी वाझेंकडून या सट्टेबाजांना दिली जात होती, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

सचिन वाझे यांनी ही रक्कम मागितल्यानंतर त्यांना आणखी एक फोन जातो. आणि ही रक्कम घेतल्यानंतर यात आम्हाला किती रक्कम मिळणार, अशी मागणी या व्यक्तीकडून केली गेली. वरुण सरदेसाई आणि सचिन वाझे यांच्यातील जे संभाषण आहे ते महत्त्वाचं आहे. या संभाषणाबद्दलची माहिती एनआयएने घ्यावी. कुणाच्या सांगण्यावरुन वरुण सरदेसाई यांनी फोन केले? वरुण सरदेसाई कुणाचे नातेवाईक आहे? वरुण सरदेसाईंवर कुणाचा आशीर्वाद आहे? हे एनआयने तपासावं, असं नितेश राणे यांनी सांगितलं. वरुण सरदेसाई यांची कॉल रेकॉर्ड जोपर्यंत तपासले जात नाहीत तोवर वाझेंच्या मागचा मास्टरमाईंड समोर येणार नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram