Nitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्य

Continues below advertisement

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर अपघातावर (Pune Porcshe Car Accident)  शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)  गप्प का आहेत?, असा सवाल भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane)  यांनी केला आहे. यावर सुप्रिय सुळेंनी प्रत्युत्तर दिले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, या प्रकरणात फोन कोणी केला. वकिल कोणी पाठवला याची चौकशी झाली पाहिजे. राजकीय दबाव कोणी टाकला? कोणामुळे बेल झाली? याचे उत्तर फडणवीसांन दिले पाहिजे.

पुणे अपघातावर पुण्याच्या पालकमंत्र्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही या विषयी विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या,  पुण्याचे पालकमंत्री याची आणि माझी ही आनेक दिवस भेट झाली नाही. इंदापुरची दुर्घटना झाली. बारामतीची अतिवृष्टी  झाली, याचा पाठपुरावा मी महाराष्ट्र सरकारकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहे. याचे उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिले पाहिजे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram