Nitesh Rane PC : Nilesh Rane यांचा बळीचा बकरा केला जातोय; नितेश राणेंनी केली भावाची पाठराखण

Continues below advertisement

सिंधुदुर्ग: भाजप नेते नारायण राणे यांना संपवण्याचा कट सुरु आहे. राणे साहेब तुम्हाला प्रचारात कुठे दिसतात का?. नारायण राणे यांना युती हवी होती. पण त्यांचा शब्द मानला नाही" असा दावा दीपक केसरकर यांनी केला. यावर पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. नारायण राणे यांची इच्छा होती, जिल्ह्यामध्ये युती व्हावी, रत्नागिरीमध्ये युती झाली पण सिंधुदुर्गमध्ये युती होऊ शकली नाही, विरोधक असेही म्हणत आहेत नारायण राणे यांचा शब्द मानला गेला नाही, यावर उत्तर देताना नितेश राणे यांनी म्हटलं की, नारायण राणे यांची इच्छा होती की शहर विकास आघाडी होऊ नये, कणकवलीत शहर विकास आघाडी होऊ नये, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊ नये, हे विधान देखील नारायण राणे यांचं होतं, शेवटी नारायण राणे हे एक प्रगल्भ नेते आहेत, त्यांना युती आघाड्या सर्व समजतं, ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांना राज्य कसं चालवायचं, कशा युती, आघाडी होतात, हे सर्व आयुष्यभर अतिशय बारकाईने त्यांनी पाहिलेलं आहे, म्हणून प्रस्ताव आले गेले, टेबलावर नेमकं काय झालं? याची माहिती त्यांना असते, असं नितेश राणे (Nitesh Rane) म्हणालेत. 

Nitesh Rane  : विकासावर बोलण्यासारखं त्यांच्याकडे काहीच नाही

तर अतिशय उत्तम संवाद नारायण राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये आहे, अतिशय उत्तम संवाद नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये देखील आहे, म्हणून त्या लोकांना माहिती आहे, काय विषय आहे तो, त्यामुळे त्यांना युतीबाबत सर्व परिस्थिती माहिती आहे, युती कशी होते वगैरे, काय मागण्या केल्या सर्व माहिती टेबलावर मिळालेली आहे. आता आपल्याला फक्त एक चुकीचं चित्र दिलं जातं, आम्ही सगळेच द्यायला तयार होतं, ते नगरअध्यक्ष पद मागत होते, भाजपाकडून त्यांच्या हक्काचं नगराध्यक्ष पद मागत होते, आम्ही त्याबद्दल काही बोललो नाही, गप्प होतो, इतका वेळ, कारण आम्हाला माहिती आहे की विकासावर बोलण्यासारखं त्यांच्याकडे काहीच नाही, असंही नितेश राणे म्हणालेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola