Nitesh Rane : पवारांचा नातू अदानींचा ड्रायव्हर होतो; ठाकरेंचा नातू अंबानींच्या लग्नात नाचतो

Continues below advertisement

Nitesh Rane : पवारांचा नातू अदानींचा ड्रायव्हर होतो; ठाकरेंचा नातू अंबानींच्या लग्नात नाचतो सध्या संपूर्ण देशात मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या लेकाच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. संगीत, हळद असे अनेक कार्यक्रम पार पडत असून राजकीय नेत्यांपासून बॉलीवूडकरांपर्यंत अनेक दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहत आहेत. इतकच नव्हे तर ही मंडळी या सोहळ्यांना उपस्थित राहून ते सोहळे गाजवत देखील आहेत. अंनत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) पार पडलेल्या संगीत सोहळ्यातही अनेकांचा विशेष अंदाज पाहायला मिळाला. पण या सगळ्यात  उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांच्या नृत्याने साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं.   अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात बॉलीवूडकरांसह तेजस ठाकरेही थिरकताना दिसले. सोशल मीडियावर सध्या तेजस ठाकरेंचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. काजोल आणि शाहरुखच्या गाण्यावर तेजस ठाकरेंनीही ताल धरला. पण तेजस ठाकरेंच्या या नृत्यावर सत्ताधाऱ्यांनी मात्र चांगलाच निशाणा साधला. त्यामुळे राजकीय वर्तुळातही तेजस ठाकरे यांचा डान्स हा चर्चेचा विषय ठरत आहे. तेजस ठाकरेंचा व्हिडीओ व्हायरल तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याला हजेरी लावली. या संगीत सोहळ्यात अंबानी कुटुंबियांसह अनेकांनी ठेका थरला. तेजस ठाकरे हे 'कभी खुशी कभी गम' या सिनेमातील ये 'लड़की, हाए, अल्लाह या गाण्यावर थिरकले.' त्यामध्ये तेजस ठाकरेंचाही समावेश आहे. सुशीलकुमार शिंदे यांचा धाकटा नातू वीर पाहारिया देखील तेजस ठाकरेंसोबत मंचावर आहे. सध्या सोशल मीडियावर तेजस ठाकरेंचे हे व्हिडीओ तुफान व्हायरल होतायत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram