Nitesh Rane On Opposition : नितेश राणे यांचा विरोधकांवर हल्लाबोल; संजय राऊतांवर टीका
Nitesh Rane On Opposition : नितेश राणे यांचा विरोधकांवर हल्लाबोल; संजय राऊतांवर टीका
ही बातमी पण वाचा
सगळं घर महिला चालवतात, 1500 देऊन अपमान का, 10 हजार रुपये द्या, लाडकी बहीण योजनेवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल
मुंबई : सरकारच्या लाडक्या बहिण योजनेवरून (Ladki Bahin Yojna) विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली आहे. सध्याच्या महागाईच्या काळात देखील महिला सगळं घर चालवतात. 1500 देऊन अपमान का करता त्यांना 10 हजार रुपये द्या, असे म्हणत लाडकी बहीण योजनेवर संजय राऊतांनी निशाणा साधला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणतात, सध्याच्या सरकारचे जे काही सुरू आहे त्याला अर्थिक बेशिस्त म्हणतात. देश किंवा राज्य चालवतान आर्थिक शिस्त म्हत्त्वाची आहे. निवडणुका जिंकण्यासाठी तुमच्या तिजोरीत पैसे नाहीत आणि तुम्ही मोठमोठ्या योजनांच्या घोषणा करत सुटले आहे. त्याला आर्थिक शिस्त म्हणत नाही. योजनांसाठी कुठून पैसे आणणार याचे काही प्लानिंग नाही. निवडणुकानंतर या योजना बंद पडणार. कारण सरकार बदलणार हा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे.
लाडक्या बहिणींचा अपमान करु नका : संजय राऊत
सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेंतर्गत त्यांना 1500 रुपये मिळतात. महागाईच्या काळात सगळं घर महिला चालवतात, त्यांना 1500 नाही तर 10 हजार रुपये द्या. महागाई, सिलेंडरचे वाढलेलले दर पाहता त्यांना जास्त पैशांची गरज आहे. पदवीधरांना आठ हजार, 12 वी पास असणाऱ्यांना सहा हजार आणि लाडक्या बहिणीला 1500 हा अपमान कशाला करता? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.