Santosh Parab हल्ल्याप्रकरणी Nitesh Rane यांना 18फेब्रुवारीपर्यंत न्यायलयीन कोठडी, कोर्टात काय झालं?
संतोष परब हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांची आजची रात्र कोठडीतच जाणार आहे... याचं कारण कणकवली न्यायालयाने त्यांना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर लगेचच नितेश राणेंकडून सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज करण्यात आला. यावर उद्या दुपारी ३ वाजता सुनावणी होणार आहे. संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना एकाच वेळी कणकवलीमधील दिवाणी व्यायालयात हजर केलं गेलं. दोघांचीही आज पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना कोर्टापुढे हजर करण्यात आलं. पोलिसांनी चौकशीसाठी नितेश राणेंची कोठडी वाढवण्याची मागणी केली होती...
पण कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावल्यानं नितेश राणेंनी जामिनासाठी अर्ज केलाय... उद्या त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे