Nitesh Rane : Ajit Pawar यांना कुठे तक्रार करायची ते करु द्या, नितेश राणे यांचं आव्हान ABP MAJHA
मुंबई : वाचाळवीरांनी थोडीशी मर्यादा पाळावी, कुठेही वेडंवाकडं विधानं करून मुख्यमंत्री वा घटकपक्षांना अडचणीत आणू नये असं सांगत अजित पवारांनी वाचाळविरांना दम दिल्यानंतर आता महायुतीतून त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. अजितदादांनी भाजपमधील वाचाळविरांची तक्रार दिल्लीतील वरिष्ठांकडे केल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी दिली. तर अजितदादांना कुठे तक्रार करायची ते करू द्या अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली.
मुस्लिमांविरोधात सातत्याने चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंसारख्या भाजपच्या नेत्यांविरोधात अजितदादांच्या राष्ट्रवादीनं अमित शाह यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती आहे. महायुतीत असूनही धर्मनिरपेक्ष राजकारण करणाऱ्या अजितदादांच्या राष्ट्रवादीत याबद्दल तीव्र नाराजी असल्याचं समजतंय. पण नितेश राणेंनी मात्र यावरून अजितदादांनाच चॅलेंज दिलंय. अजितदादांना कुठे तक्रार करायची ते करू द्या, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे असं आमदार नितेश राणे म्हणाले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र नितेश राणेंची पाठराखण केल्याचं दिसतंय.
अजितदादांची दिल्लीच्या नेत्यांकडे तक्रार
भारतीय पक्षातील काही नेत्यांकडून अशा प्रकारची वक्तव्य केली जात असून त्याबद्दल अजित दादांनी केंद्रातील नेत्यांकडे याबाबत नाराजी व्यक्त केली आहे ही माहिती खरी असल्याचं राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी दिली.