Nitesh Rane : नितेश राणेंची अटक अटळ? सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत काय झालं?
Continues below advertisement
केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणेंची अटक अटळ मानली जातेय. कारण संतोष परब हल्लाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं देखील नितेश राणेंना जामीन नाकारला आहे...मात्र जामीन नाकारताना सर्वोच्च न्यायालयानं काहीसा दिलासा देखील दिलाय. १० दिवस नितेश राणेंना अटकेपासून दिलासा मिळालाय. या कालावधीत नितेश राणेंना जिल्हा न्यायालयासमोर हजर राहून जामिनासाठी अर्ज करावा लागणार आहे. न्यायालयात मुकुल रोहतगी यांनी नितेश राणे यांची, तर अभिषेक मनू सिंघवी यांनी राज्य सरकारची बाजू मांडली. सुनावणीत काय युक्तिवाद झाला पाहुयात.....
Continues below advertisement