Nitesh Rane : नितेश राणेंना हायकोर्टाचा दणका, संतोष परब हल्लाप्रकरणी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Continues below advertisement

भाजपा आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसलाय. शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळलाय. कणकवली इथल्या सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिल्यानंतर नितेश राणेंंनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. मात्र उच्च न्यायालायनेही नितेश राणे यांना दिलासा देण्यास नकार दिलाय. दरम्यान नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला तरी सर्वोच्च न्यायालयात या आदेशाला आव्हान देता यावे यासाठी दोन आठवड्यांची मुदत राणेंच्या वकीलांनी कोर्टाकडे मागितलीय. ((त्यामुळे नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार कायम आहे.)) दुसरीकडे संतोष परब हल्ला प्रकरणातील दुसरा आरोपी  मनीष दळवीला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram