Nitesh Rane : संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणेंना जामीन मिळणार? ABP Majha

संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणेंना अटकपूर्व जामीन मिळणार की नाही याचा निर्णय आज सुनावला जाणार आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायमूर्ती आज फैसला सुनावणार आहेत. संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांनी जामिनासाठी प्रयत्न सुरु केले... सत्र न्यायालयानं जामीन नाकारल्यानंतर नितेश राणेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली.. दरम्यान म्याव म्याव घोषणेमुळं सरकारचा अंहकार दुखावला आणि म्हणून माझ्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा नितेश राणेंकडून करण्यात येतोय.. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नितेश राणे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola