Nitesh Rane on Sanjay Raut : 10 मिनिटं सुरक्षा हटवा, संजय राऊत उद्या दिसणार नाही: नितेश राणे

Continues below advertisement

Sanjay Raut on Shivsena and BJP : विधीमंडळ हे तर 'चोर'मंडळ आहे, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना गट आणि भाजपवर (BJP) निशाणा साधताना केलं आहे. पण राऊतांच्या याच वक्तव्यावरुन आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Budget Session) तिसऱ्या दिवशी गदारोळ सुरु आहे. राऊत यांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजप आणि शिवसेना गटाचे आमदार आक्रमक झाले आहेत. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर विधीमंडळ सभागृहात हक्कभंग आणण्याची मागणी केली आहे. दरम्यान, गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं आहे. संजय राऊतांनी चोरमंडळ उल्लेख केल्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आज  त्यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीला अनुमोदन देताना शिंदे गटाच्या भरत गोगावले यांनीही त्यांना अपशब्द वापरला. राऊतांच्या वक्तव्यासंदर्भात बोलताना अपशब्द वापरल्यानंतर ठाकरे गटाच्या रवींद्र वायकर यांनी आक्षेप घेत गोगावलेंना सुनावले. या मुद्द्यावरुन सभागृहात गदारोळ झाला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram