Cyclone Nisarga | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अलिबाग दौऱ्यावर, वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार
निसर्ग चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला तडाखा बसल्यानंतर त्याठिकाणी किती मोठं नुकसान झालंय हे हळूहळू समोर येत आहे. अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरातील गावांना या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संपूर्ण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज अलिबागच्या दौऱ्यावर जाणार आहेत