कर्जबुडवा Nirav Modi चा मित्र Subhash Shankar Parab ला भारतात आणण्यात यश : ABP Majha


13 हजार कोटींच्या पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपींपैकी एक सुभाष शंकर परबला भारतात आणण्यात सीबीआयला यश आलंय. हजारो कोटींचं कर्ज बुडवणारा नीरव मोदी याचा जवळचा सहकारी अशी सुभाषशंकर परबची ओळख. त्याला इजिप्तच्या कैरोमधून विशेष विमानानं भारतात आणण्यात आलं.. 49 वर्षीय सुभाष शंकर परबविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली होती. दरम्यान भारतात आणल्यानंतर सीबीआयनं सुभाषशंकर परबला अटक केली आहे.. त्याला आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola