Nirav Modi Property Seize : नीरव मोदी याच्या 39 मालमत्ता जप्त होणार, कशाचा असणार समावेश?
Continues below advertisement
कर्ज बुडवून परदेशात पळालेल्या उद्योगपती नीरव मोदी याच्या 39 मालमत्ता जप्त करण्यास कोर्टानं मान्यता दिलीय. कोर्टाच्या निर्णयामुळे काळाघोडा येथील रिदम हाऊस, अलिबाग येथील बंगला आणि 22 महागड्या कार जप्त करण्याचा मार्ग मोकळा झालाय. ईडीने नीरव मोदी याच्या 929 कोटींच्या 48 मालमत्ता जप्त करण्याच्या परवानगीसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. त्यापैकी 39 मालमत्ता जप्त करण्यास कोर्टानं मान्यता दिलीय. पंजाब नॅशनल बँकेत 13 हजार 500 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा नीरव मोदीवर आरोप आहे. कर्ज बुडवून देशाबाहेर पळालेल्या नीरव मोदीच्या हस्तांतरणाच्या प्रक्रियेवर सध्या लंडनच्या न्यायालयात खटला सुरु आहे.
Continues below advertisement