Nimbalkar Vs Nimbalkar: 'पार्टी सोडेन पण Ranjeetsinh सोबत नाही', Ramraje Nimbalkar यांचा थेट इशारा
Continues below advertisement
फलटणमधील (Phaltan) राजकीय वातावरण निंबाळकर घराण्यातील वादामुळे तापले असून, रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) आणि रणजितसिंह निंबाळकर (Ranjeetsinh Nimbalkar) यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आहे. 'पार्टी जरी सोडायला लागली तरी चालेल, परंतु या बाबाच्या पॅनलमध्ये आम्ही राहणार नाही,' असा थेट इशाराच रामराजे निंबाळकर यांनी दिला आहे. डॉक्टरांच्या आत्महत्येच्या प्रकरणावरून सुरू झालेला हा वाद आता अधिकच पेटला आहे. रणजितसिंह निंबाळकरांनी 'मास्टरमाइंड' असल्याचा आरोप केल्यानंतर, रामराजेंनी २७७ केसेस घेऊन न्यायालयात जाण्याची धमकी दिली आहे. इतकेच नाही, तर आपण स्वतः फलटणच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. रणजितसिंह यांच्या दुग्धाभिषेकावर टीका करताना 'ते देव आहेत का?' असा सवाल करत रामराजेंनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement