Nilesh Rane Sindhudurg : वेल्डिंग नीट झाली नव्हती की नंतर बिघडवण्यात आली? नाईकांवर निशाणा

Nilesh Rane Sindhudurg : वेल्डिंग नीट झाली नव्हती की नंतर बिघडवण्यात आली? नाईकांवर निशाणा


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी तज्ञ समितीने अहवाल सादर केला आहे. तज्ञ समितीने दिलेल्या अहवालात वेल्डिंग नीट झाली नव्हती किंवा गंज चढली अशी माहिती दिली आहे मात्र वेल्डिंग नीट झाली नवहती की नंतर बिघडवण्यात आली हा विषय राहतो. याच कारणामुळे आमदार वैभव नाईक यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं. या चौकशीतून योग्य ती माहिती बाहेर पडेलच. मात्र या पुतळा दुर्घटना प्रकरणी वैभव नाईक यांचं नाव येणे खरखरच लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. असं काय झालं की वैभव नाईक यांच्यावर संशय घ्यावा लागला. वैभव नाईकांवर संशय घ्यावा लागला की लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. एवढ्या मोठ्या विषयात आमदार म्हणून वैभव नाईक यांचे नाव येत हे शरमेने मान खाली घालायचा विषय आहे, अशी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्या वर केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola