Nilesh Rane : किरीट सोमय्या यांचा उद्याचा दौरा हा यशस्वी होणारच, कोण रोखतो ते पाहतोच : निलेश राणे
Nilesh Rane : किरीट सोमय्या यांचा उद्याचा दौरा हा यशस्वी होणारच. आम्हाला कोण रोखतो ते आम्ही पाहतोच असं प्रतिआव्हान भाजपचे नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडीला दिले आहे. किरीट सोमय्या यांच्या दापोली दौऱ्यावरून महाविकास आघाडीने त्यांना रोखण्याची भाषा केली होती. त्याला निलेश राणे यांनीही उत्तर दिले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्याचे अकरा नव्हे तर 1100 प्रॉपर्टी बाहेर येतील असं देखील निलेश राणे म्हणालेत