Nilesh Rane News : निलेश राणे शिवसेनेतून लढणार?; उदय सामंत म्हणाले...

Continues below advertisement

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election)  पार्श्वभूमीवर सध्या महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये सध्या जागावाटपाची बोलणी सुरु आहेत. ही सगळी चर्चा सुरु असताना भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांचे सुपुत्र निलेश राणे (Nilesh Rane) शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. नारायण राणे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा बंगल्यावरील भेटीनं चर्चाना उधाण आले हे.  तर निलेश राणे पक्षात आल्यास सेनेची ताकद त्यांच्या मागे उभी करणार, अशी प्रतिक्रिया उदय सामंतांनी (Uday Samant)  दिली आहे.

विधानसभा निवडणुकीचं बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकतं. त्यामुळे आता इच्छुकांनी आपल्या उमेदवारीसाठी सर्व जोर पणाला लावलाय. यामध्ये आता नारायण राणेंनीही एन्ट्री घेतलीय. माजी खासदार निलेश राणे यंदा कुडाळ मालवणमधून आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज नारायण राणेंनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत चर्चा केली. या भेटीनंतर शिंदेंनी तळकोकणातील कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चेसाठी तात्काळ उदय सामंतांना वर्षावर बोलावल्याची माहिती आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram