Nilesh Rane Full PC : निवडणूक जिंकायची हेच आमचं लक्ष्य; बाळासाहेबांवर प्रेम होतं; अजूनही आहे - राणे

Continues below advertisement

Nilesh Rane Full PC : निवडणूक जिंकायची हेच आमचं लक्ष्य; बाळासाहेबांवर प्रेम होतं; अजूनही आहे - राणे 

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे (Nilesh Ran) हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. उद्या (23 ऑक्टोबर) 4 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आभार मानले. आताची विधानसभा निवडणूक आम्ही युती म्हणून सामोरे जाऊन निवडून येणार असल्याचे राणे म्हणाले.  बाळासाहेब ठाकरे हे माझे कायम दैवत  गेले अनेक दिवस निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा सुरु होती. आज अखेर त्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेत प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. 2019 ला नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या सोबत ते भाजपमध्ये आले होते. आताची विधानसभा निवडणूक आम्ही युती म्हणून सामोरे जाऊन निवडून येणार असल्याचे राणे म्हणाले. नारायण राणे यांनी ज्या चिन्हावर राजकारणात सुरुवात झाली, त्याच चिन्हावर मी आता निवडणूक लढवणार असल्याचे निलेश राणे म्हणाले. पक्ष हितासाठी जे करता येईल ते करणार आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे माझे कायम दैवत आहेत, ते कायम दैवत राहणार असल्याचे राणे म्हणाले.   पक्ष हितासाठी जे करायचं ते मी करेन माझ्या घरात अनेक वर्षे लाल दिवा होता. मी कुणाशी स्पर्धा करण्यासाठी नाही तर विकास करण्यासाठी निवडणूक लढणार असल्याची माहिती निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पक्ष हितासाठी जे करायचं आहे ते मी करेन असंही ते म्हणाले. निलेश राणे उद्याचा केव्हाही विचार करत नाही. मी जसा आहे तसा आहे. उद्या भरगच्च कार्यक्रम होणार आहे. प्रेमापोटी ज्यांना ज्यांना यायचं आहे ते येणार असल्याचे राणे म्हणाले. कुडाळमध्ये मोठा कार्यक्रम घेणार आहे. मी लहान कार्यकर्ता आहे, मला निवडणूक लढायची असल्याचे राणे म्हणाले.   निलेश राणे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार निलेश राणे यांना कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, माजी खासदार निलेश राणे यांनी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार अशी पत्रकार परिषदेत घोषणा केल्यानंतर अवघ्या काही मिनिटात त्यांच्या सोशल मीडियावरील भाजप चिन्हाचे असलेले पोस्टर्स हटवले आहे. आता शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह असलेले पोस्टर्स त्यांनी अपलोड केले आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram