Nilesh lanke Protest : जिल्ह्यात काही पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध धंदे सुरु, लंकेंची कारवाईची मागणी
अहमदनगर येथील खासदार निलेश लंके यांनी जिल्ह्यातील पोलिसांचा भ्रष्टाचार उघड करत पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन सुरू केल आहे... जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असून यामध्ये पोलीस कर्मचारी सहभागी असल्याचा आरोप लंके यांनी केला आहे...पोलीस दलातील काही अधिकारी आणि कर्मचारी भ्रष्टाचाराने इतके बरबटले आहेत की, कोट्यावधीची माया जमा करत असल्याचा आरोप लंके यांनी केलाय त्यामुळे पोलिसांच्या या भूमिकेमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाल असून काही व्यापारी देखील जेरीस आले आहेत... अशा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करावे अशी मागणी लंके यांनी आपल्या निवेदनात केली आहे... सोमवारी दुपारपासून सुरू केलेलं आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरूच असून पोलीस अधीक्षकांनी लंके यांच्या आंदोलनाची दखल घेत काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत... तर लंके यांच्या मागण्यांबाबत चौकशी करून कारवाई करण्याबाबतचा शब्दही दिला आहे मात्र लंके यांनी जोपर्यंत निलंबन होत नाही तोपर्यंत आपण आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका घेतली आहे.