Nilesh Lanke on Police Bharti :पोलीस भरती पुढे ढकला;निलेश लंकेंची मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे मागणी
Nilesh Lanke on Maharashtra Police Bharti: अहमदनगर : राज्यात (Maharashtra News) सुरू असलेली पोलीस भरती (Police Bharati) प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, अहमदनगरचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे. पावसामुळे (Rain Updates) उमेदवारांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, भरती प्रक्रिया (Recruitment Process) पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे.
अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी राज्यभर सुरू होत असलेली पोलीस भरती पुढे ढकलावी अशी मागणी केली आहे. सध्या राज्यभर जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. त्यातच पाऊस सुरू असल्यानं उमेदवारांचा सराव देखील झालेला नाही. त्यामुळे ही भरती पुढे ढकलावी, अशी मागणी निलेश लंके यांनी केली आहे.