Nilesh Lanke Oath in English : मी इंग्रजी शिकत नसतो डायरेक्ट भाषण करत असतो, निलेश लंकेंनी शब्द पाळला

Continues below advertisement

म्यान, लोकसभा निवडणुकीच्या काळात नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात आमदार संग्राम जगताप यांनी ‘रील पेक्षा रियलमध्ये विकास करणाऱ्या खासदाराला आपल्याला संसदेत पाठवायचे असल्याचे म्हटले होते. तसेच, सुजय विखेंचा एक व्हिडीओ दाखवत, काही जण रिल्स बनवू काम केल्याचा दिखावा करतात, असा टोलाही लगावला होता. जगताप यांनी दाखवलेल्या काही व्हिडीओमध्ये विखे पाटील यांच्या संसदेतील इंग्रजी भाषणांचांही समावेश होता.

याच इंग्रजी भाषणांचा धागा पकडून सुजय विखेंनी, ‘मी जेवढे इंग्रजी बोललो तेवढे समोरच्या उमेदवाराने किमान पाठ करून सभेत बोलून दाखवावे. तसे झाले तर मी माझा उमेदवारी अर्जच भरणार नाही.’ असे आव्हान दिले होते. पण निलेश लंके यांनी हे आव्हान स्वीकारले आणि संसदेत इंग्रजी भाषेतून शपथ घेतली. त्यानंतर आता शरद पवार यांनी निलेश लंकेंचे तोंडभरून कौतुक केले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram