Nilesh Lanke Sharad Pawar Special Report : निलेश लंके अजित पवार यांची साथ सोडणार? शक्यता किती?
Continues below advertisement
Nilesh Lanke, अहमदनगर : "अजून काहीच ठरलेले नाही. राजकारण हे क्षणाला बदलत असते. राजकारणात पुढील काळातील गोष्टींबाबत आत्ता चर्चा करणे, योग्य नाही. त्याला काही अर्थही नसतो. तुम्ही सर्वजण या सर्वांचे साक्षीदार आहात. राजकारणात पुढे काय होणार आहे? हे कोणालाच माहिती नसते. काही काळानंतर मीडियासमोर वेगळेच चित्र दिसते. लोकसभा मतदारसंघात मी संपर्क वाढवला आहे. माझ्या सहकाऱ्यांची देखील इच्छा आहे. मात्र, अद्याप मी त्याबाबतचा ठोस निर्णय घेतलेला नाही.", असं पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) म्हणाले. निलेश लंके (Nilesh Lanke) हे शरद पवार गटात प्रवेश करणार, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. दरम्यान, आज नगर येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी यावर भाष्य केलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Sharad Pawar Ahmednagar Amol Kolhe Lok Sabha Nilesh Lanke Ajit Pawar Lok Sabha 2024 Lok Sabha 2024 Election