Nilesh Ghaiwal : निलेश घायवळला आमदार चंद्रकांत पाटलांचे आशीर्वाद, रवींद्र धंगेकरांचे आरोप
Continues below advertisement
गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) लंडनला (London) फरार झाल्याने राजकारण तापले आहे. घायवळला कोथरूडचे (Kothrud) आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा आशीर्वाद असल्याचा खळबळजनक आरोप रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केला आहे. "निलेश घायवळनं पासपोर्ट कसा मिळवला याच्यामध्ये कोणते अधिकारी कोणते नेते आहेत का हे देखील तपासून त्यांना ताब्यात घ्यायला हवं," अशी मागणी धंगेकरांनी केली आहे. दुसरीकडे, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) असे काहीही करू शकत नाहीत, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी त्यांची पाठराखण केली आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे गुंडाच्या पलायन प्रकरणाला राजकीय वळण लागले असून, पासपोर्टच्या चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement