Nikhil Shende Honey Trap Case : निखिल असं कृत्य करु शकत नाही, आईची भावना : ABP Majha

Continues below advertisement

डीआरडीओ चे अधिकारी प्रदीप कुरलुकर यांच्या हनी ट्रॅप प्रकरणाच्या तपासा दरम्यान नाव आलेल्या निखिल शेंडेच्या कुटुंबीयांनी निखिल पूर्णपणे निर्दोष असल्याचा दावा केला आहे... निखिलची आई आणि काकांनी एबीपी माझाशी exclusive बातचीत करताना निखिल निर्दोष असल्याचा आणि त्याला कोणीतरी फसवल्याचा दावा केला आहे... मुळात धावपटू असलेला निखिल शेंडे 2015 मध्ये हवाई दलात रुजू झाला होता...निखिल कधीच शत्रूराष्ट्राला गुप्त माहिती देणार नाही, अशी त्याच्या आईची भावना आहे. लहानपणापासून निखिलचा सांभाळ करणारे त्याचे काका राम शेंडे हेही निखिलच्या एटीएस मार्फत चौकशीच्या बातमीमुळे धक्क्यात आहेत... निखिल कधीही चुकीचे कृत्य करू शकत नाही, त्याला कोणीतरी फसवले आहे, असा दावा राम शेंडे यांनी केला आहे..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram