Nick Jonas : निक जोनासचं सोलापूरच्या चादरीपासून बनवलेला शर्ट घालून फोटोशूट, चाटला उद्योगाचे मालक म्हणाले...

Continues below advertisement

सोलापुरची चादर संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध आहे. मात्र आता ही चादर जगभरात पोहोचलीय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अमेरिकन गायक आणि अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती निक जोनस याने याच सोलापुरी चादरपासून बनवण्यात आलेला ड्रेस परिधान केलाय. स्वत: निक जोनस याने या कपड्याचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. सेंट लुईसमध्ये झालेल्या कार्य़क्रमात या कपड्यांनी उब दिली असे म्हणत त्याने हे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत दिसणाऱ्या कपड्यात सोलापुरातील चाटला टेक्स्टाईल इंडिस्ट्रीजचा लोगो प्रिंट करण्यात आला आहे. यासंदर्भात आम्ही चाटला टेक्स्टाईल इंडस्ट्रिजचे गोवधर्न चाटला यांच्याशी संपर्क साधला. कालपासून अनेक जण त्यांना फोनकरुन यासंदर्भात विचारणा करत आहेत. त्यांची चादर जगभरात पोहोचल्याने त्यांचे कौतूक करत आहेत. चाटला टेक्स्टाईल इंडस्ट्रिजमध्ये दरवर्षी फॅशन डिजाईन शिकणारे विद्यार्थी इंटनर्शिपसाठी येत असतात. तसेच देशभरात देखील चादरचे डिलर आहेत. त्यांच्यामाध्यमातून ही चादर निक यांच्यापर्यंत पोहोचली असावी अशी माहिती गोवर्धन चाटला यांनी दिली. त्यांच्याशी बातचित केलीय आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram