US Visa Rules: 'मधुमेह असणाऱ्या कोट्यवधी भारतीयांना धोका?', जाणून घ्या अमेरिकेचे नवे व्हिसा नियम

Continues below advertisement
अमेरिकेच्या व्हिसा नियमांमध्ये आरोग्याच्या कारणास्तव करण्यात येणाऱ्या संभाव्य बदलांमुळे भारतीय अर्जदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 'अर्जदार उपचारांचा खर्च करण्यास सक्षम आहे का, याचा विचार व्हायला हवा', अशा प्रकारच्या सूचना व्हिसा अधिकाऱ्यांना मिळाल्याचे वृत्त आहे. विशेषतः मधुमेह, रक्तदाब आणि लठ्ठपणा यांसारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या मोठ्या संख्येने भारतीयांवर याचा परिणाम होऊ शकतो. ताज्या आकडेवारीनुसार, भारतात सुमारे १०.१ कोटी नागरिक मधुमेहाने ग्रस्त आहेत, तर १३.६ कोटी लोक प्री-डायबेटिक आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, व्हिसा अधिकारी अर्जदाराच्या आरोग्याच्या स्थितीचे मूल्यांकन करून तो भविष्यात अमेरिकेच्या आरोग्यसेवेवर 'Public Charge' म्हणजेच ओझे बनू शकतो का, याचा विचार करू शकतात. यापूर्वी डोनाल्ड ट्रंप प्रशासनाने आरोग्य विम्याचा पुरावा अनिवार्य करणारा एक फतवा काढला होता, जो नंतर बायडेन प्रशासनाने रद्द केला. मात्र, ताज्या नियमांमुळे पुन्हा एकदा अर्जदारांची चिंता वाढली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola