New Labour Code Salary Rule : दरमहा 50,000 पगार असेल तर हातात किती रक्कम येणार?

मित्रांनो, जर तुमचा पगार ५० हजार रुपये असेल, तर तुमच्या हातात येणारा पगार कमी होणार आहे! हे मी नाही तर सरकारचे नवीन लेबर लॉ सांगत आहेत. पण यात तुमचा तोटा आहे की फायदा? चला, सोप्या भाषेत समजून घेऊया! न्यू लेबर कोड 2026 नव्या कायद्यानुसार एक महत्त्वाचा नियम आलाय.. तो म्हणजे ५० टक्क्यांचा नियम. आता तुमच्या एकूण पगाराच्या (CTC) किमान ५०% हिस्सा हा तुमचा 'बेसिक पे' (Basic Salary) असणे अनिवार्य आहे. सध्या कंपन्या टॅक्स वाचवण्यासाठी बेसिक कमी ठेवतात आणि भत्ते जास्त देतात, पण आता हे चालणार नाही!

बघा, जर तुमचा बेसिक पगार २५ हजार झाला, तर साहजिकच तुमची PF कपात वाढणार. याचा अर्थ असा की, दरमहा तुमच्या हातात मिळणारा पगार अंदाजे ६०० ते ८०० रुपयांनी कमी होईल. आता तुम्ही म्हणाल, पगार कमी झाला मग फायदा काय? तर त्याचे दोन मोठे फायदे आहेत

1. ग्रॅच्युइटीमध्ये मोठी वाढ: ग्रॅच्युइटी नेहमी बेसिक पगारावर मोजली जाते. बेसिक वाढल्यामुळे तुम्ही नोकरी सोडताना मिळणारी ग्रॅच्युइटीची रक्कम 5 वर्षात आता थेट ७० ते ७५ हजारांच्या पार जाईल 

2. पीएफमध्ये तुमची कपात वाढली की कंपनीचा वाटाही वाढतो. म्हणजे निवृत्तीच्या वेळी तुमच्या हातात व्याजासह मिळणारी रक्कम जुन्या पद्धतीपेक्षा खूप जास्त असेल.

थोडक्यात सांगायचं तर, आज तुमच्या खिशात थोडे कमी पैसे येतील, पण तुमचं भविष्य सुरक्षित होणार आहे. हा कायदा म्हणजे 'आजची थोडी कपात, उद्याची मोठी सुरक्षा' असा आहे!

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola