NEET-UG Exam 2024 Results : NEET परीक्षा नीट घेता आली नाही? नेमका गोंधळ काय?

Continues below advertisement

NEET-UG Exam 2024 Results : NEET परीक्षा नीट घेता आली नाही? नेमका गोंधळ काय?

RE-Exam for Grace Marks Students: नीट यूजी 2024 मध्ये (NEET Exams) ग्रेस मार्क मिळालेल्या 1 हजार 563 मुलांचे निकाल रद्द केले जाणार असल्याची महत्त्वाची माहिती केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) सुनावणी दरम्यान दिली आहे. तसेच, निकाल रद्द झालेल्यांना पुन्हा परीक्षा देण्याची मुभा सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे. 

NEET निकालानंतर दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की, ग्रेस गुण मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेतली जाईल. त्याचबरोबर समुपदेशनावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. NEET UG 2024 परीक्षेत ग्रेस गुण मिळालेल्या उमेदवारांची पुनर्परीक्षा 23 जून रोजी पार पडणार आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचं एनटीएच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram