Neet Exam Teacher Arrest : लातूर पेपर फुटीप्रकरणी कोचिंग क्लासेस चालवणारे दोन शिक्षक ताब्यात

Continues below advertisement

Neet Exam Teacher Arrest : लातूर पेपर फुटीप्रकरणी कोचिंग क्लासेस चालवणारे दोन शिक्षक ताब्यात  नीट पेपर फुटी प्रकरणी दोन शिक्षक नांदेड एटीएसच्या ताब्यात... एक लातूरमध्ये तर दुसरा सोलापूर येथे कार्यरत.... दोघे ही जिल्हा परिषद शाळेत आहेत शिक्षक...दोघांची कसून चौकशी सुरू वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या (नीट) पेपरफुटीचे धागेदोरे आता लातूरपर्यंत पोहोचले आहेत. नांदेडच्या एटीएस पथकाने लातूरमध्ये दोन ठिकाणी छापे टाकून जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आले आहे. संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण अशी या शिक्षकांची नावे आहेत. पेपरफुटी प्रकरणात या शिक्षकांचा सहभाग असल्याचा एटीएसला संशय आहे. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या परीक्षेत (नीट) घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. लातूरमध्येही नीट आणि जेईईच्या तयारीसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी खासगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेत असतात. त्यामुळे परीक्षा गैरव्यवहारात या शहराचे काही धागेदोरे आहेत का या दृष्टीने तपास सुरू होता. शनिवारी रात्री नांदेड एटीएसच्या हाती हे दोघे शिक्षक लागले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram