NEET Entrance: ऑल इंडिया कोट्यात आरक्षणाचा मार्ग मोकळा ABP Majha
Continues below advertisement
नीट-पीजी वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत ओबीसींना २७ टक्के आणि आर्थिकदृष्टय़ा मागास घटकाला १० टक्के आरक्षण लागू करण्याविरोधातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देणार आहे. आर्थिकदृष्टय़ा मागास घटकाला आरक्षण द्यायचे असेल तर अडीच लाखांची उत्पन्न मर्यादा असायला हवी, अशी भूमिका याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अरविंद दातार यांनी न्यायालयात मांडली.
Continues below advertisement