Neelam Gorhe on Majha Katta : मी मृत्यूची वाट पाहत होते... भावूक होत नीलम गोऱ्हेंचा खळबळजनक खुलासा

Continues below advertisement

Neelam Gorhe on Majha Katta : मी मृत्यूची वाट पाहत होते... भावूक होत नीलम गोऱ्हेंचा खळबळजनक खुलासा

Neelam Gorhe Majha katta : मी कोणतेही पद डोळ्यासमोर ठेऊन शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला नसल्याचे वक्तव्य विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी केलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मी त्यांना पत्र दिले होते. लोकांना त्यांनी भेटावं यासंदर्भात मी त्यांनी सांगितल्याचे निलम गोऱ्हे म्हणाल्या. जेवढी लोकांची अपेक्षा आहे, तेवढा वेळ उद्धव साहेबांनी दिला नाही. ठाकरे गटात संवादाचा अभाव असल्याचे गोऱ्हे यावेळी म्हणाले. निलम गोऱ्हे एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर संवाद साधला.

उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर चर्चेची दार बंद झाली

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर आणि आजारी पडल्यानंतर चर्चेची दार बंद झाल्याचे गोऱ्हे म्हणाल्या. आता त्यांना जास्त त्रास द्यायला नको म्हणून मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतल्याचे गोऱ्हे म्हणाल्या.

उद्धव साहेब मुख्यमंत्री व्हावे ही माझी इच्छा होती. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्ष संघटनेत गती येईल असं वाटलं होतं. पण तसं झालं नसल्याचे निलम गोऱ्हे म्हणाल्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर एवढं बंदिस्त राजकारण होईल असं वाटलं नव्हतं असे गोहरे म्हणाल्या. त्यांचे पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष झाल्याचे गोऱ्हे म्हणाल्या. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावले तर मी जाईल. मात्र आता त्याच्या गटात प्रवेश करणार नसल्याचे गोऱ्हे म्हणाल्या.

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram