NDA Cadet Death : NDA मध्ये कॅडेटची मृत्यू, सिनिअर्सवर छळाचा गंभीर आरोप
Continues below advertisement
पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) येथे प्रशिक्षण घेणाऱ्या अंतरिक्ष कुमार या १८ वर्षीय कॅडेटने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. 'त्याला सुसाइड करण्याची वेळ का आली?' असा सवाल करत, सिनिअर्सच्या त्रासाला कंटाळूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप अंतरिक्षच्या कुटुंबीयांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंतरिक्षने काही दिवसांपूर्वी आपल्या सिनिअर्सकडून होत असलेल्या त्रासाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन देऊनही परिस्थितीत बदल झाला नाही. अखेर, अंतरिक्षने आपल्या वसतिगृहातील खोलीत जीवन संपवले. याप्रकरणी एनडीए प्रशासनाने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement