Dhule | धुळ्यात राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांसमोरच कार्यकर्ते भिडले

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील व्यंकटेश लॉन्स येथे सुरू असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दोन गटांमध्ये तुफान वाद झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांचे कार्यकर्ते भुषण पाटील हे भाषण करीत असताना जिल्हा परिषदेचे माजी सभापती किरण पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी वाद घातल्याने अनिल गोटे आणि किरण पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समोरच वाद सुरू झाला. दरम्यान या वादामुळे धुळे शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दोन गट पडल्याचे चित्र पाहायला मिळाले

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola