NCP vs AIMIM : एमआयएम नेत्यांच्या टीकेला संग्राम जगताप यांचं जहरी प्रत्युत्तर
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार संग्राम जगताप आणि एमआयएमचे (AIMIM) नेते इम्तियाज जलील यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. जलील यांच्या टीकेला उत्तर देताना संग्राम जगताप यांनी, 'पहिले हर रोज एक छोटासा चिंटू वह बोलता था। अब आपके शहर में एक चिकनी चमेली आई हुई है,' असा घणाघात केला आहे. जगताप यांनी जलील आणि ओवैसींचा 'बोकडं' असा उल्लेख करत, 'एक हैदराबादहून मोठं बोकडं आलं, खुराड जलील बोकडं आलं आणि एक इकडे एक छत्रपती संभाजीनगरचं एक बोकडं आलं आहे,' असे म्हटले आहे. या सर्व प्रकारामुळे अजित पवार गटाची राजकीय अडचण झाली आहे. एकीकडे अजित पवार स्वतःला शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेचे मानतात आणि संघाच्या कार्यक्रमांपासून दूर राहतात, तर दुसरीकडे त्यांचेच आमदार कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेत असल्याने, सत्तेसाठी भाजपसोबतची युती चालते मग आमदारांची हिंदुत्ववादी भूमिका का नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement