NCP Symbol Row | राष्ट्रवादी पक्ष-चिन्हावर २२ जुलैला Supreme Court मध्ये सुनावणी

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतची महत्त्वाची सुनावणी २२ जुलै रोजी Supreme Court मध्ये होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होईल. यापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाने आपल्या 'घड्याळ' या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी जाहिरातींमध्ये एक प्रकारचा डिस्क्लेमर देण्याचा निर्णय Supreme Court ने दिला होता. आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर Supreme Court मध्ये सुनावणी होणार असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकांच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची दोन गटांमध्ये विभागणी झाल्यानंतर पक्षाचे चिन्ह आणि नाव अजित पवार यांच्या गटाकडे आले आहे. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीतही याच चिन्हावर अजित पवार गटाने निवडणूक लढवली होती. या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola