Women's Quota : 'स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% जागा द्या', Sharad Pawar गटाच्या महिला आघाडीची मागणी

Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीची आजपासून दोन दिवसीय जिल्हास्तरीय बैठक सुरू होत आहे. या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे (Rohini Khadse) उपस्थित राहणार आहेत. 'येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना ५० टक्के जागा राखीव ठेवण्यात याव्यात', ही या बैठकीतील प्रमुख मागणी असणार आहे. शरद पवार यांनी यापूर्वीच महिला आरक्षणाच्या मुद्द्याला आपला पाठिंबा दर्शवला आहे. या बैठकांमध्ये आगामी निवडणुकांसाठी पक्षाच्या महिला संघटनेची रणनीती ठरवली जाणार असून, संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला जाणार आहे. शरद पवार गटाने नुकतीच पक्षाची जिल्हानिहाय बैठक घेतली होती, त्यानंतर आता महिला आघाडीच्या बैठकांवर लक्ष केंद्रित केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola