Voter List Row: 'निवडणूक पुढे ढकलावी', राष्ट्रवादीचे Shashikant Shinde यांची आयोगाकडे मागणी
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीतील त्रुटींवरून गंभीर आरोप केले आहेत. 'हे दुबार नाव अधिकाऱ्यांच्या असलेल्या संगनमतानेच आल्याचा आमचा अरोप आहे,' असे खळबळजनक वक्तव्य शिंदे यांनी केले आहे. मतदार यादीतील बोगस आणि दुबार नावांच्या तक्रारींची निवडणूक आयोगाने दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, ही चौकशी निःपक्षपातीपणे व्हावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. जोपर्यंत मतदार यादी दुरुस्त होत नाही, तोपर्यंत विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणीही शिंदे यांनी केली. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष या मुद्द्यावर एकत्र असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement