Jayant Patil : निवडणूक आयोग माहिती लपवतंय', 1 तारखेला मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा- जयंत पाटील
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) आणि इतर विरोधी पक्षांनी महाराष्ट्रातील मतदार याद्यांमधील (Voter Lists) गंभीर त्रुटींबद्दल निवडणूक आयोगाला (Election Commission) धारेवर धरले आहे. 'ज्यांना चोरीच्या वाटेने मतदार घुसडलेल्या मतदार यादीचा फायदा होतो, ते आमच्या मोर्चामध्ये येणार नाहीत,' असा थेट आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. निवडणूक आयोगाकडून मिळालेली उत्तरे समाधानकारक नसल्याने, या विरोधात मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यामध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांचा पक्ष पूर्ण ताकदीने सहभागी होणार आहे. एकाच महिलेचे नाव सहा ठिकाणी असणे, मतदारांचे पत्ते आणि वय चुकलेले असणे, तसेच मतदारांच्या तक्रारींची दखल न घेणे यांसारख्या अनेक प्रकरणांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लोकशाहीचा पाया असलेल्या मतदार याद्याच सदोष असतील, तर निवडणुका निष्पक्ष कशा होतील, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement