NCP Supreme Court : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह वादावर आज सुनावणी

Continues below advertisement

NCP Supreme Court : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह वादावर आज सुनावणी  
हेही वाचा :

लोकसभा निवडणुकीत झालेल्या जोरदार राजकीय संघर्षानंतर संपूर्ण राज्याला आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मविआ (MVA) याच कामगिरीची पुनरावृत्ती करणार का, महायुती (Mahayuti) या धक्क्यातून सावरत पुन्हा कमबॅक करणार, याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. मात्र, विधानसभा निवडणूक नक्की कधी होणार, मतदान आणि मतमोजणीची तारीख काय असणार, याबाबत निवडणूक आयोगाकडून (Election Commission) अद्याप कोणतीही वाच्यता करण्यात आलेली नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार विधानसभा निवडणूक (VidhanSabha Election 2024) ऑक्टोबर महिन्यात न होता नोव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. यंदा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच दिवाळी आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचे मतदान आणि मतमोजणी दिवाळी संपल्यानंतरच पार पडेल, असे समजते. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी संपल्यानंतर मतदानाची प्रक्रिया संपन्न होऊ शकते. त्यानंतर साधारण 14 किंवा 15 नोव्हेंबरच्या आसपास विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात नियमानुसार नवी विधानसभा 26 नोव्हेंबर 2024 रोजी अस्तित्त्वात येणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर साधारण 45 दिवसांनी नवीन विधानसभेची स्थापना होणे अपेक्षित असते. त्यामुळे निवडणूक आयोगाने नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणूक घ्यायचे ठरवले तर त्यासाठी साधारण 12 ऑक्टोबरच्या आसपास सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. तेव्हापासून राज्यात लगेच आदर्श आचारसंहिता लागू होईल. त्यानंतर 45 दिवसांचा कालावधी गृहित धरला तरी 26 नोव्हेंबरपूर्वी नव्या विधानसभेची स्थापना होणे शक्य आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram