Satara Elections :सातारा जिल्हा बँकेच्या निकालानंतर NCPच्या कार्यालयावर दगडफेक,शशिकांत शिंदेंची माफी
राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार शशिकांत शिंदेंचा सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एक मतानं पराभव झाल्यानंतर, त्यांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली. दरम्यान कार्यकर्त्यांच्या या कृत्याबद्दल आमदार शशिकांत शिंदेंनी माफी मागितलीय. पक्ष नेतृत्त्वावर विश्वास असून, कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीबद्दल शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांची माफी मागतो अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदे यांनी एबीपी माझाला दिलीय..