Milind Ekbote On Ajit Pawar : हिंदू समाजाला दुखावण्याचा प्रयत्न, मिलिंद एकबोटे यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पक्षांतर्गत वातावरण तापलं आहे. अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर, आता मिलिंद एकबोटे (Milind Ekbote) यांनी अजित पवारांना थेट इशारा दिला आहे. 'तुम्ही हिंदूंच्या मतांवर निवडून आलेले असतानासुद्धा तुम्ही हिंदू हिताची भूमिका मांडणाऱ्या संग्राम जगतापवर कारवाईचे आदेश द्यायचा प्रयत्न करता हे चांगलं नाहीये', असं म्हणत एकबोटे यांनी अजित पवारांना सुनावलं आहे. पक्षानं वारंवार समज देऊनही दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य केल्यानं संग्राम जगताप अडचणीत आले आहेत. त्यांनी बीडमधील हिंदू जनाक्रोश मोर्चाकडे पाठ फिरवून मुंबईतील राष्ट्रवादीच्या बैठकीला हजेरी लावली, ज्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement