Sangram Jagtap : 'दिवाळीत फक्त Hindu कडून खरेदी करा',जगताप यांच्या वक्तव्याने वाद
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. 'दिवाळीमध्ये केवळ हिंदूंकडूनच खरेदी करा', असे विधान जगताप यांनी केले होते, ज्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) गट अडचणीत आला आहे. अजित पवार यांनी भाजपसोबत युती केली असली तरी, त्यांनी संघाच्या विचारधारेपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, जगताप यांच्या या भूमिकेमुळे ते पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या वक्तव्याची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी आमदार संग्राम जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागितला आहे. आता पक्ष जगताप यांच्यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement