Sangram Jagtap यांचं वक्तव्य पक्षाच्या भूमिकेशी विसंगत, म्हणून नोटीस पाठवली - Ajit Pawar

Continues below advertisement
राष्ट्रवादीचे (NCP) आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पक्ष अडचणीत सापडला आहे, तर अजित पवार (Ajit Pawar) गटाने त्यांना नोटीस बजावली आहे. यावर सुप्रिया सुळे (Supriya Sule) आक्रमक झाल्या आहेत. 'नुसती नोटिस देऊन होणार नाही. पक्षातून काढून टाकायला पाहिजे,' अशी थेट मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. दिवाळीत 'फक्त हिंदूंकडून खरेदी करा' असं आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केलं होतं, ज्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला. हे वक्तव्य पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात असल्याचे सांगत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी नोटीस बजावल्याचे स्पष्ट केले. यावर आपण दादांशी (अजित पवार) बोलू, अशी प्रतिक्रिया जगताप यांनी दिली. दुसरीकडे, AIMIM नेत्यावर टीका करताना जगताप यांनी वापरलेल्या 'बोकडं' यांसारख्या शब्दांमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे आता पक्ष जगतापांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola